Book Description
कृषी उद्योजकतेच्या वाटेवर... शेतकरी ते कृषी उद्योजक होण्याचा एक यशस्वी प्रवास... ‘कृषी उद्योजकतेच्या वाटेवर’ हे पुस्तक शेतकरी आणि कृषी क्षेत्रात नवे प्रयोग करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नवउद्योजकासाठी एक सखोल व अनुभवाधारित मार्गदर्शक असणार आहे. यात एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा संघर्षातून झालेला प्रेरणादायी प्रवास उलगडतो, जो शेतमालाच्या ट्रेडिंगपासून सुरू होतो, क्लिनिंग-ग्रेडिंग आणि शेवटी मोठ्या प्रोसेसिंग उद्योगापर्यंत पोहोचतो. या पुस्तकात तुम्हाला योग्य व्यवसायाची निवड, मार्केट रिसर्च, ग्राहकांचा अभ्यास, स्पर्धकांची माहिती आणि उत्पादने नेमकी कोणासाठी आणि कशा पद्धतीने तयार करावीत, याची उत्तरे सापडतील. ट्रेडिंगपासून प्रायमरी आणि सेकंडरी प्रोसेसिंग प्रकल्प उभारण्याचा टप्पा सविस्तरपणे मांडलेला आहे. व्यवसायासाठी भांडवल उभारणी, बँक कर्जासाठीची पूर्वतयारी, खेळत्या भांडवलाचं नियोजन आणि कॅश-फ्लोचे महत्त्व हे धनंजयला आलेल्या अडचणींमधून लक्षात येते. शासकीय योजनांची मदत, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी व मार्गदर्शन याविषयीची सविस्तर माहिती मिळते. व्यवसायाला नाव मिळवून देण्यासाठी ब्रँडिंग आणि मार्केटिंगचे महत्त्व कळते. विक्री व्यवस्थापन, पेमेंट सायकल, उधारी नियंत्रण, खेळते भांडवली कर्ज आणि ओव्हरड्राफ्ट या व्यवहारांची व्यावसायिक हाताळणीही यातून शिकायला मिळते. या पुस्तकात एका उद्योजकाचा यश आणि अपयश यातला संघर्ष, संकटं, स्पर्धा, चुकीचे निर्णय, व्यवस्थापनातील त्रुटी यावर मात करत घडत असलेला यशस्वी उद्योजक आपल्याला दिसतो. एकंदरीत, हे पुस्तक म्हणजे ‘कृषी उद्योजकतेचा रोडमॅप’ आहे. हे वाचून वाचकाला प्रेरणा, दिशा आणि स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरु करण्याचा आत्मविश्वास मिळतो आणि म्हणूनच, ज्याला कृषी क्षेत्रात स्वतःचं काहीतरी वेगळं करायचं आहे, त्याच्यासाठी हे पुस्तक एक विश्वासार्ह मार्गदर्शक व साथीदार ठरेल.