About This Event
शेतीतून उद्योजकतेकडे
कृषी व्यवसाय सुरू करायचाय? ही संधी सोडू नका!
कृषी उद्योजकता कार्यशाळा 2025
कृषी उद्योजकतेची वाटचाल आणि अपरिहार्यता समजावणारी एकदिवसीय कार्यशाळा.
आपण कृषी उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात? पण प्रश्न पडतो – व्यवसायाची सुरुवात नेमकी कुठून व कशी करावी? कोणता व्यवसाय निवडावा? भांडवल कुठून उभारावं? बँकेकडून कर्ज कसं घ्यावं? कोणत्या शासकीय योजनांचा लाभ घेता येईल? कोणतं तंत्रज्ञान निवडावं? कायदेशीर परवाने कसे मिळवावेत? मार्केटिंग, ब्रँडिंग आणि ग्राहक मानसिकता कशी समजून घ्यावी?
हे सर्व समजून घेऊन जर तुम्हालाही एक यशस्वी कृषी उद्योजक व्हायचं असेल, तर बालाजी सर्व्हिसेस व अॅफेसर सोल्युशन्स प्रा. लि. आयोजित "कृषी उद्योजकता" या एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी व्हा.
🧩 कार्यशाळेतील मार्गदर्शन विषय
- कृषी उद्योजकतेतील संधी व तरुणांनी का वळले पाहिजे
- व्यवसायाचा दृष्टीकोन व उद्योजकीय मानसिकता
- योग्य व्यवसायाची निवड कशी करावी
- शेतमालाची मूल्यसाखळी (Value Chain)
- शेतकरी उत्पादक कंपनी
- मार्केट रिसर्च, ग्राहक अभ्यास व संभाव्य बाजारपेठ
- विक्री पद्धती – B2B, B2C, D2C
- कृषी व्यवसायाचे ५ स्तंभ
- ट्रेडिंग, प्रायमरी व सेकंडरी प्रोसेसिंग
- मॅन्युफॅक्चरिंग उद्योग सुरू करताना काळजी MVBP, Product Range
- SOP, Inventory Management, Store Keeping
- ब्रँडिंग, मार्केटिंग, कॅश-फ्लो व्यवस्थापन
- फॅमिली फार्मर, मिलेट्सप्रीनर, कृषीपूरक व्यवसाय
- करार शेतीचे स्वरूप
- बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय नोंदणी, कायदेशीर बाबी
- शासकीय योजना – PMFME, CMFME, AIF, PSI, AMI, CMEGP
- प्रश्नोत्तर सत्र
🗓️ कार्यशाळेची माहिती
- दिनांक: शनिवार, १३ सप्टेंबर २०२५
- वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००
- स्थळ: रहमत सुलतान हॉल (ए/सी), छबुराव लांडगे चौक, मिलन हॉटेल शेजारी, सर्जेपूरा, अहिल्यानगर
💰 नोंदणी शुल्क
₹500/- (नॉन-रिफंडेबल) – चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षण साहित्य व सहभाग प्रमाणपत्रासह.
📞 नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क
8805643333 / 8857089557
📌 नियम व अटी
- नोंदणीसाठी फी भरणे आवश्यक आहे.
- जागा मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.
- नोंदणी अहस्तांतरणीय आहे. नोंदणी फी परत केली जाणार नाही.
- सकाळी ९ वाजता कार्यशाळेच्या जागेवर पोहोचणे आवश्यक आहे.
- कार्यशाळेच्या वेळ व स्वरूपात बदल करण्याचा अधिकार आयोजकांकडे राहील.
End Date & Time
September 13, 2025
05:00 AM
Event Capacity
97 attendees
This Event Has Concluded
Thank you to everyone who attended this event!
Event Details
Date
Saturday, September 13, 2025
Time
10:00 AM - 05:00 AM
Venue
रहमत सुलतान हॉल (ए/सी) छबुराव
रहमत सुलतान हॉल (ए/सी) छबुराव लांडगे चौक, मिलन हॉटेल शेजारी, सर्जेपूरा, *अहिल्यानगर*
Capacity
97 attendees